Description
🧪 रासायनिक घटक
▸ यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन 23% एस.सी. (Azoxystrobin 23% SC Suspension Concentrate) हा रासायनिक घटक असतो.
🏷️ रासायनिक गट
▸ स्ट्रोबिल्यूरिन (Strobilurins)
🛡️ बुरशीनाशक प्रकार व क्रिया
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर (Systemic + Translaminar)
▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते.
▸ ट्रान्सलॅमिनर असल्यामुळे पानाच्या वरच्या भागाद्वारे शोषले जाते व पानांच्या खालच्या बाजूला झिरपते.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक
⚙️ कार्यपद्धती (Mode of Action)
▸ ॲझॉक्सिस्ट्रोबिन हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील आहे.
▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया मधील श्वसनसाखळीत अडथळा आणते. परिणामी बुरशीला ऊर्जा (ATP) मिळत नाही आणि तिचा नाश होतो.
🚿 वापरण्याची पद्धत
▸ फवारणी (Foliar Spray)
🌾 पीक व लक्षित बुरशीजन्य रोग (पूर्ण यादी)
(टेबल पूर्ण पाहण्यासाठी डावीकडे सरकवा 👉)
| पिक | लक्ष्यित बुरशीजन्य रोग |
|---|---|
| कांदा | ▸ जांभळा करपा ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ डाऊनी मिल्ड्यू (early stage) |
| कोबी, फुलकोबी | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सेप्टोरिया ठिपके ▸ डाऊनी मिल्ड्यू |
| बटाटा | ▸ लवकर येणारा करपा ▸ अल्टरनारिया ▸ उशीरा येणारा करपा (early stage) |
| काकडी, कारले | ▸ अँथ्रॅकोज ▸ अल्टरनारिया ▸ डाऊनी मिल्ड्यू ▸ भुरी (secondary) |
| आले, हळद | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ पानांवरील करपा ▸ रायझोम रॉट |
| टोमॅटो | ▸ अँथ्रॅकोज ▸ अर्ली ब्लाईट ▸ लेट ब्लाईट (early) ▸ भुरी |
| मिरची | ▸ अँथ्रॅकोज ▸ अल्टरनारिया ▸ भुरी (secondary) |
| वांगे, भेंडी | ▸ अँथ्रॅकोज ▸ अल्टरनारिया ▸ भुरी |
| कापूस | ▸ अल्टरनारिया ▸ रस्ट (secondary) |
| झेंडू, शेवंती | ▸ अल्टरनारिया ▸ ग्रे मोल्ड (early stage) |
| ऊस | ▸ पानांवरील ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| भुईमूग | ▸ अर्ली/लेट लीफ स्पॉट ▸ रस्ट |
| सोयाबीन | ▸ अँथ्रॅकोज ▸ सेप्टोरिया ▸ रस्ट |
| डाळवर्गीय | ▸ अँथ्रॅकोज ▸ रस्ट ▸ ठिपके |
| भात | ▸ करपा / ब्लास्ट ▸ तपकिरी ठिपके |
| गहू, मका | ▸ पानांवरील ठिपके ▸ रस्ट (secondary) |
| द्राक्ष | ▸ भुरी ▸ डाऊनी मिल्ड्यू |
✅ कोणत्या रोगांवर प्रभावी आहे?
| बुरशीचे नाव | रोग |
|---|---|
| Colletotrichum spp. | अँथ्रॅकोज / करपा |
| Alternaria spp. | अर्ली ब्लाईट / ठिपके |
| Cercospora spp. | पानांवरील ठिपके |
| Oidium / Erysiphe | भुरी (Powdery Mildew) |
| Botrytis cinerea | ग्रे मोल्ड / फळकुज |
| Pyricularia oryzae | करपा / ब्लास्ट (भात) |
❌ खालील रोगांवर वापरू नका
| बुरशीचे नाव | कारण |
|---|---|
| Fusarium spp. | मातीजन्य रोग (मर) |
| Rhizoctonia solani | खोडकुज / ब्लॅक स्कर्फ |
| Sclerotinia spp. | व्हाइट मोल्ड |
| Verticillium spp. | व्हर्टिसिलियम मर |
📏 फवारणी प्रमाण
▸ प्रमाण : 0.75 ml ते 1 ml प्रती लीटर
✨ मुख्य वैशिष्ट्ये
- विस्तृत श्रेणीतील नियंत्रण – Mildew, Blight, Mold, Rust, Leaf Spot
- आंतरप्रवाही आणि ट्रान्सलॅमिनर क्रिया
- उत्कृष्ट प्रतिबंधात्मक क्रिया
- पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – पाने हिरवीगार होतात
- एस.सी. स्वरूप – द्रव असल्याने वापरणे सोपे
⚠️ महत्वाची तांत्रिक माहिती
‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे: अझॉक्सिस्ट्रोबिन हे ‘स्ट्रोबिल्युरिन’ गटातील आहे. सलग वापर टाळा.
‘मोड ऑफ ॲक्शन’ बदला: साखळी तोडण्यासाठी मधल्या काळात ‘ट्रायझोल’ किंवा ‘M-45’ वापरा.
‘टँक मिक्स’ धोरण: हे औषध कधीही एकटे वापरू नका. यासोबत M-45, कवच किंवा अँट्राकोल वापरा.
वारंवारता: एका पिकाच्या हंगामात जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरा.
प्रतिबंधात्मक वापर: रोग येण्यापूर्वी वापरणे सर्वात सुरक्षित आहे.
🎥 कृषिविद्या व्हिडिओ
+
व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला सरकवा (Scroll) 👉
📊 Strobilurin गटातील तुलना
+
| रोग गट | Azoxystrobin | Trifloxystrobin | Pyraclostrobin |
|---|---|---|---|
| Downy mildew | उत्कृष्ट | चांगले | चांगले |
| Powdery mildew | चांगले | उत्कृष्ट | चांगले |
| Rust (तांबेरा) | मध्यम | मध्यम | उत्कृष्ट |
🔄 Amistar ला पर्याय
+
❓ शेतकऱ्यांचे प्रश्न (FAQ)
+
हो, आंतरप्रवाही व ट्रान्सलॅमिनर आहे.
हो, भुरीवर हे अत्यंत प्रभावी आहे.
हो, बहुतेक टॉनिक सोबत चालते.
हो, ट्रान्सलिमीनर असल्यामुळे हलक्या पावसात टिकतो.
साधारण 7 दिवस.
Strobilurin.
हो, लवकर येणाऱ्या करप्यावर प्रभावी.
अत्यंत उपयुक्त.
नाही, टाळावे.
160 ml ते 200 ml.
📞 आमच्याशी संपर्क करा
⭐ शेतकऱ्यांचे रिव्ह्यू
+
“मिरचीवरील करपा यावर प्रभावी नियंत्रण मिळाले.”
“टोमॅटो पिकात चांगला रिझल्ट मिळाला.”
“कलिंगड भुरी रोगावर प्रभावी नियंत्रण मिळाले.”



