Description
फवारणीचे फायदे
✅ Bayer Antracol आणि Bayer Buonos या दोन बुरशीनाशकांचा एकत्रित वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ Bayer Solomon या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
▸ Bayer Antracol : 2 ग्रॅम प्रति लिटर
▸ Bayer Buonos : 2 ml प्रति लिटर
▸ Bayer Solomon : 0.5 ml प्रति लिटर
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
1️⃣ Bayer Antracol
2️⃣ Bayer Buonos
3️⃣ Bayer Solomon
फवारणी करताना घ्यायची काळजी
✅ फवारणी ही सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम मिळतील.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी.
✅ योग्य फवारणी नौझलचा वापर करावा.
✅ फवारणी द्रावणाचा pH संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण वापरू नये.


