Description
रासायनिक घटक
▸ यामध्ये कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू.पी. (Carbendazim 50% WP – Wettable Powder) हा रासायनिक घटक असतो.
रासायनिक गट
▸ बेंझिमिडाझोल (Benzimidazole )
बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:
▸ बुरशीनाशक प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
▸ आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणी द्वारे वापरल्यानंतर पानांच्या पर्णरंद्राद्वारे आत मध्ये शोषले जाते व वनस्पतींच्या झायलम पेशींच्याद्वारे सर्व भागात पोहचते.
▸ क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक
▸बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीस उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.
▸ टिप : Carbendazim मध्ये eradicant action नसते.म्हणजेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप वाढल्यानंतर हा fungicide fungus पूर्ण नष्ट करू शकत नाही.
कार्यपद्धती (Mode of Action)
▸ कार्बेन्डाझिम (Carbendazim) हे कोशिकाविभाजन अवरोधक (Cell Division Inhibitor) गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
▸ हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशींमधील β-ट्युब्युलिन (β-tubulin) प्रथिनाशी संलग्न होते व त्यामुळे मायटोसिस (कोशिकाविभाजन) प्रक्रिया थांबते.यामुळे मायक्रोट्युब्युल्स तयार होत नाहीत, पेशी विभाजन होऊ शकत नाही आणि बुरशीची वाढ व प्रसार थांबतो. परिणामी बुरशीची वाढ हळूहळू खुंटते.
वापरण्याची पद्धत
▸ फवारणी,आळवणी,ठिबक,बीजप्रक्रिया
Carbendazim 50% WP पीक व लक्षित बुरशीजन्य रोग
| पिक | लक्ष्यित बुरशीजन्य रोग |
|---|---|
| कांदा | ▸ जांभळा करपा (सुरुवातीची अवस्था) ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ फ्युजारियम मुळकुज (early stage) ▸ कंदकुज (सुरुवातीस) |
| कोबी फुलकोबी ब्रोकोली रेड कॅबेज |
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके |
| बटाटा |
▸ लवकर येणारा करपा (Early blight – early stage) |
| काकडी कारले दोडका दुधी भोपळा घोसवळे |
▸ अँथ्रॅकोज करपा (early stage) |
| आले हळद |
▸ रायझोम कंदकुज (seed treatment / early drenching) ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ कंदकुज (सुरुवातीची अवस्था) |
| टोमॅटो |
▸ फ्युजारियम रोपमर (early) |
| मिरची ढोबळी मिरची |
▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ फ्युजारियम रोपमर ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ कॉलर रॉट (early drenching stage) |
| वांगे | ▸ फ्युजारियम रोपमर ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ कॉलर रॉट (early) |
| भेंडी | ▸ फ्युजारियम रोपमर ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ कॉलर रॉट (early) |
| गवार | ▸ फ्युजारियम रोपमर ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ कॉलर रॉट (early) |
| कापूस | ▸ फ्युजारियम रोपमर (early) ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ बियाणे कुज (seed treatment) |
| झेंडू | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फ्युजारियम मर (early) ▸ फुलकुज (early) |
| शेवंती | ▸ अल्टरनारिया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फ्युजारियम मर (early) ▸ फुलकुज (early) |
| ऊस | ▸ कांडी कुज (early sett treatment) ▸ लाल मर (initial symptoms) |
| भुईमूग | ▸ सरकोस्पोरा ठिपके (early) ▸ मुळकुज (early) ▸ बियाणे कुज |
| सोयाबीन | ▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके ▸ फ्युजारियम मुळकुज ▸ फ्युजारियम बियाणे कुज |
| वाल घेवडा | ▸ अँथ्रॅकोज करपा ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸ सारकोस्पोरा पोरा पानांवरील ठिपके ▸ फुजारियम मुळकुज |
| मटकी मुग चवळी उडीद |
▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फ्युजारियम मुळकुज ▸ बियाणे कुज |
| हरभरा | ▸ फुजारियम मुळकुज ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ बियाणे कुज |
| वाटाणा | ▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ अल्टरनेरीया ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फ्युजारियम मुळकुज ▸ बियाणे कुज |
| कलिंगड खरबूज |
▸ अँथ्रॅकोज करपा (early) ▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके ▸ सरकोस्पोरा ठिपके ▸ फ्युजारियम रोपकुज (early) ▸ कॉलर रॉट (early) |
| भात | ▸ तपकिरी ठिपके ▸ रोपकुज (nursery stage) ▸ कणीस कुज (early infection) ❌ शीथ रॉट – शिफारस नाही ▸उगवणीतील कुज |
| गहू |
▸ सेप्टोरिया ठिपके |
| मका | ▸पानांवरील ठिपके ▸फुजारियम खोडकुज ▸फुजारियम मुळकुज |
| फ्रेंच बिन्स | ▸अँथ्रॅकोज करपा ▸सारकोस्पोरा पानांवरील ठिपके ▸फुजारियम मुळकुज ▸ अल्टरनेरीया ठिपके |
Carbendazim 50% WP – बुरशी व लक्षणे ओळख चार्ट
| बुरशीचे नाव (Scientific Name) |
त्यामुळे होणारा रोग (Disease Name) |
लक्षणे (Symptoms) |
|---|---|---|
| कोलेटोट्रिकम (Colletotrichum) |
अँथ्रॅकोज / करपा (Anthracnose) | पानांवर, फांद्यांवर किंवा फळांवर काळे गोलाकार डाग पडतात. फळे सडतात. |
| फुजारियम (Fusarium) |
मर रोग / मूळकुज (Wilt / Root Rot) |
झाडाची अन्नवाहिनी (Xylem) ब्लॉक होते, झाड अचानक कोमेजते आणि वाळते. |
| सरकोस्पोरा (Cercospora) |
पानांवरील ठिपके (Leaf Spot) |
पानांवर तपकिरी किंवा राखाडी रंगाचे ठिपके पडतात. |
| ओडिअम / इरसिफी (Oidium / Erysiphe) |
भुरी (Powdery Mildew) | पानांवर, कळ्यांवर किंवा फळांवर पांढऱ्या पावडरसारखी बुरशी वाढते. |
| रायझोक्टोनिया (Rhizoctonia) | खोडकुज / कंदकुज / ब्लॅक स्कर्फ | जमिनीलगतचे खोड कुजते किंवा बटाट्यावर काळे फोड (Black Scurf) येतात. रोपे कोलमडतात. |
| बोट्रायटीस (Botrytis) |
ग्रे मोल्ड / फळकुज (Gray Mold) |
फळांवर राखाडी रंगाची बुरशी येते आणि फळ मऊ होऊन सडते. |
| अल्टरनारिया (Alternaria) |
पानांवरील ठिपके (Early Blight) |
पानांवर वलयांकित काळे/तपकिरी ठिपके (Target board spots) दिसतात. |
| सेप्टोरिया (Septoria) |
पानांवरील ठिपके (Leaf Spot) |
पानांवर लहान, गोल, राखाडी किंवा पांढऱ्या केंद्राचे ठिपके पडतात. |
| स्क्लेरोटिनिया (Sclerotinia) | पांढरी बुरशी / खोडकुज (White Mold) | खोडावर पांढरी कापसासारखी बुरशी वाढते आणि खोड पोकळ होते. |
| फोमोप्सिस (Phomopsis) |
फळकुज / करपा (Fruit Rot / Blight) |
वांग्याची फळे देठाकडून सडतात. द्राक्षाच्या काडीवर काळे डाग पडतात. |
| पिरिक्युलारिया (Pyricularia) | करपा / ब्लास्ट (Blast) |
पानांवर ‘डोळ्याच्या आकाराचे’ (Spindle shaped) तपकिरी ठिपके पडतात. मानेवर बुरशी येऊन ओंबी मोडते. |
| व्हर्टिसिलियम (Verticillium) | व्हर्टिसिलियम मर (Verticillium Wilt) |
फुजारियमसारखेच लक्षणे. झाड अर्धे किंवा पूर्ण उभे वाळते. |
| पेस्टालोटिया (Pestalotia) |
देवी रोग / ठिपके (Canker / Spot) |
फळांवर किंवा पानांवर काळे खरबडीत ठिपके किंवा खड्डे पडतात. |
प्रमाण
▸ फवारणीसाठी : 1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸ आळवणीसाठी : 1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर
▸ ठिबकसाठी : 500 ग्रॅम प्रती एकर
थिओफेनेट मिथाइल प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management)
‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम आणि थिओफेनेट मिथाइल हे दोन्ही एकाच ‘बेंझिमिडाझोल’ (Benzimidazole – FRAC Group 1) गटातील बुरशीनाशके आहेत. त्यांची कार्यपद्धती १००% समान आहे. जर बुरशीने कार्बेन्डाझिम विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती थिओफेनेट मिथाइलला सुद्धा आपोआप प्रतिकार करते.
▸ टीप: जर तुम्ही Carbendazim फवारणीसाठी वापरले असेल, तर त्यानंतरच्या फवारणीत Thiophanate Methyl वापरू नका. त्याऐवजी दुसऱ्या गटातील औषध वापरा.
‘मोड ऑफ ॲक्शन’ मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: हे बुरशीनाशक बुरशीच्या पेशी विभाजनातील ‘बीटा-ट्युबुलिन’ (Beta-tubulin) तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते. जर याचा वारंवार वापर केला, तर बुरशी या प्रक्रियेला बायपास करायला शिकते आणि बुरशीनाशक काम करणे थांबवते.
▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, पुढील फवारणीत ‘ट्रायझोल’ (उदा. स्कोअर/फॉलिक्युअर – गट ३) किंवा ‘स्ट्रोबिल्युरिन’ (उदा. अमिस्टार/कस्टोडिया – गट ११) गटातील बुरशीनाशक वापरावे.
‘टँक मिक्स’ धोरण (Tank Mix Strategy – Multi-site Action):
▸ शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम हे एक ‘सिंगल साईट’ (Single Site) बुरशीनाशक आहे. बुरशीला फक्त एकाच ठिकाणचा हल्ला परतवून लावायचा असल्याने ती लवकर रेझिस्टंट बनते.
▸ टीप: कार्बेन्डाझिम कधीही एकटे (Solo) वापरू नका. हे नेहमी ‘मॅन्कोझेब’ (M-45), ‘झायनेब’ किंवा ‘कॅप्टन’ सारख्या मल्टी-साईट बुरशीनाशकासोबत मिसळूनच वापरावे. यामुळे रिझल्ट वाढतो आणि रेझिस्टन्स येत नाही.
वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे बुरशीनाशक जास्तीत जास्त २ वेळा वापरावे.
▸ टीप: एका पाठोपाठ एक सलग (Sequential) दोन फवारण्या कार्बेन्डाझिमच्या घेऊ नयेत. मधल्या काळात स्पर्शजन्य बुरशीनाशकाचा वापर करावा.
उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: कार्बेन्डाझिम हे बुरशीची वाढ रोखणारे बुरशीनाशक आहे. जेव्हा बुरशीची संख्या कमी असते, तेव्हा हे उत्तम काम करते. पण बुरशीची संख्या प्रचंड वाढल्यास रेझिस्टंट बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते.
▸ टीप: रोगाची लक्षणे दिसताच किंवा ढगाळ वातावरण असताना रोग येण्यापूर्वीच (Preventive) याचा वापर करावा. ‘लेट स्टेज’ मध्ये याचा वापर टाळावा.
योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: जर डोस कमी पडला (Sub-lethal dose), तर कमकुवत बुरशी मरते पण सशक्त (Mutated) बुरशी जिवंत राहते आणि आपली नवीन, बुरशीनाशकला न जुमानणारी पिढी तयार करते.
▸ टीप: नेहमी शिफारस केलेला डोस (१ ते २ ग्रॅम प्रति लिटर – पिकानुसार) वापरावा आणि फवारणी करताना पूर्ण झाड व्यवस्थित भिजेल याची काळजी घ्यावी.
मुख्य वैशिष्ट्ये:
▸ विस्तृत श्रेणीतील नियंत्रण (Broad Spectrum Control) – करपा (Anthracnose), भुरी (Powdery Mildew), पानावरील ठिपके (Leaf Spot), फळकूज (Fruit Rot), मर रोग (Wilt) यांसारख्या विविध बुरशीजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण.
▸ आंतरप्रवाही क्रिया (Systemic Action) – हे पूर्णपणे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. हे पानांवाटे आणि मुळांवाटे शोषले जाते आणि संपूर्ण पिकात पसरून रोगाचा सामना करते.
▸ दुहेरी कार्यपद्धती (Preventive & Curative) – हे प्रतिबंधात्मक (रोग येण्याआधी) आणि उपचारात्मक (रोग आल्यानंतर) अशा दोन्ही प्रकारे उत्कृष्ट काम करते.
▸ पिकाचा आरोग्य परिणाम (Phytotonic Effect) – याच्या फवारणीमुळे पिकावर हिरवेपणा येतो (Greening Effect) आणि पांढऱ्या मुळांच्या वाढीस चालना मिळते, ज्यामुळे पिक तजेलदार दिसते.
▸ WP स्वरूप (Wettable Powder) – हे पाण्यात मिसळणारी पावडर (WP) स्वरूपात उपलब्ध आहे, जे फवारणी आणि आळवणी (Drenching) साठी वापरणे सोपे आहे.
▸ दीर्घकाळ टिकणारे संरक्षण – आंतरप्रवाही असल्यामुळे हे पिकाला बुरशीपासून दीर्घकाळ संरक्षण देते.
🎥 कृषिविद्या व्हिडिओ
खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇
शेतकऱ्यांचे Crystal Bavistin बद्दल सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १: Bavistin बुरशीनाशक आंतरप्रवाही की स्पर्शजन्य आहे?
उत्तर: Bavistin हे संपूर्णपणे आंतरप्रवाही (Systemic) बुरशीनाशक आहे.
प्रश्न २: Bavistin कोणत्या रासायनिक गटातील आहे?
उत्तर: हे बेंझिमिडाझोल (Benzimidazole) रासायनिक गटातील बुरशीनाशक आहे.
प्रश्न ३: Bavistin systemic आहे का?
उत्तर: हो, हे Systemic आहे. हे मुळे आणि पानांद्वारे शोषले जाते आणि संपूर्ण झाडात पसरते.
प्रश्न ४: Bavistin मध्ये preventive आणि curative गुण आहेत का?
उत्तर: हो. हे रोग येण्याआधी (Preventive) आणि रोग आल्यानंतर (Curative) अशा दोन्ही प्रकारे काम करते, पण preventive म्हणून जास्त प्रभावी आहे
प्रश्न ५: Bavistin कोणत्या रोगांवर जास्त परिणामकारक आहे?
उत्तर: भुरी (Powdery mildew), पानावरील ठिपके (Leaf spot), मर रोग (Wilt), फळकूज (Fruit rot) आणि भातावरील ब्लास्ट.
प्रश्न ६: Bavistin आणि Roko (Thiophanate Methyl) मध्ये काय फरक आहे?
उत्तर: Bavistin मध्ये ‘कार्बेन्डाझिम’ असते, जे थेट काम करते. Roko (Thiophanate Methyl) झाडात गेल्यावर त्याचे रूपांतर ‘कार्बेन्डाझिम’ मध्ये होते. त्यामुळे Bavistin ची ॲक्शन थोडी जलद असू शकते, पण दोन्हीचे काम सारखेच आहे.
प्रश्न ७: Bavistin ला पर्याय काय आहे?
उत्तर: Bavistin, Agrozim (Carbendazim 50%) किंवा गरज असल्यास Sixer/Saaf (संयुक्त बुरशीनाशक).
प्रश्न ८: Bavistin भुरीवर (Powdery Mildew) किती प्रभावी आहे?
उत्तर: भुरी रोगावर (उदा. द्राक्ष, बेर, वाटाणा) Bavistin अत्यंत प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे.
प्रश्न ९: Bavistin करपा (Anthracnose) नियंत्रणासाठी वापरावा का?
उत्तर: हो, द्राक्ष आणि मिरचीमधील करपा नियंत्रणासाठी याचा वापर होतो.
प्रश्न १०: Bavistin मर रोगावर (Wilt/Root rot) चालतो का?
उत्तर: हो, मर रोग आणि मुळकुजीसाठी Bavistin ची आळवणी (Drenching) करणे हा पिकासाठी जीवनदायी उपाय आहे.
प्रश्न ११: Bavistin फळकूजवर (Fruit Rot) मदत करतो का?
उत्तर: हो, फळांची सडणे थांबवण्यासाठी आणि साठवणुकीतील रोगांसाठी (Post-harvest) हे वापरतात.
प्रश्न १२: Bavistin पानांवरील ठिपके (Leaf Spot) वर किती परिणामकारक आहे?
उत्तर: भुईमुगाचा ‘टिक्का रोग’ (Tikka disease) आणि वांग्यावरील पानांच्या ठिपक्यांवर हे हुकमी औषध आहे.
प्रश्न १३: Bavistin डाय बॅक (Die-back) नियंत्रणासाठी वापरता येतो का?
उत्तर: हो, मिरची आणि संत्री-मोसंबीमध्ये फांदी वाळणे रोखण्यासाठी याचा वापर होतो.
प्रश्न १४: पानांवर डाग आले असतील तर Bavistin द्यावा का?
उत्तर: हो, बुरशीची वाढ त्वरित थांबवण्यासाठी याचा वापर होतो (Curative).
प्रश्न १५: Bavistin फवारणीसाठी किती ग्रॅम प्रति लिटर वापरावे?
उत्तर: फवारणीसाठी १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी (पिकाच्या अवस्थेनुसार).
प्रश्न १६: एका एकरासाठी Bavistin किती लागते?
उत्तर: फवारणीसाठी साधारण २५० ग्रॅम ते ४०० ग्रॅम प्रति एकर.
प्रश्न १७: Bavistin किती दिवसांनी पुन्हा फवारावे?
उत्तर: साधारणपणे १४-१५ दिवसांनी दुसरी फवारणी घेऊ शकता.
प्रश्न १८: रोग फार वाढला असेल तर डोस किती ठेवावा?
उत्तर: डोस २ ग्रॅम/लिटर पेक्षा वाढवू नका. त्याऐवजी Bavistin सोबत M-45 (Mancozeb) मिसळून फवारा.
प्रश्न १९: पावसाळ्यात Bavistin वापरू शकतो का?
उत्तर: हो, हे आंतरप्रवाही (Systemic) असल्याने पावसाळ्यात फवारणीसाठी हे उत्तम आहे, कारण ते पानात लवकर शोषले जाते.
प्रश्न २०: फवारल्यानंतर पाऊस आला तर परिणाम कमी होणार का?
उत्तर: जर फवारणीनंतर २-३ तास पाऊस आला नाही, तर औषध झाडात पूर्ण शोषले जाते.
प्रश्न २१: फवारणीस योग्य वेळ कोणती?
उत्तर: सकाळी दव वाळल्यानंतर किंवा सायंकाळी ४ नंतर.
प्रश्न २२: टोमॅटोमध्ये Bavistin कोणत्या रोगावर देतात?
उत्तर: टोमॅटोमधील मर रोग (Wilt) आळवणीसाठी आणि फळकुज नियंत्रणासाठी.
प्रश्न २३: मिरचीमध्ये मर रोग (Wilt) आहे; Bavistin वापरू शकतो का?
उत्तर: हो, मिरचीमध्ये मर रोगासाठी Bavistin ची आळवणी (Drenching) अत्यंत गुणकारी आहे.
प्रश्न २४: द्राक्षामध्ये Bavistin कधी वापरतात?
उत्तर: द्राक्षामध्ये फ्लॉवरिंगनंतर आणि मणी सेटिंगच्या काळात भुरी नियंत्रणासाठी याचा वापर होतो.
प्रश्न २५: कांद्यामध्ये Bavistin वापरावे का?
उत्तर: हो, कांदा लागवडीपूर्वी रोपांची मुळे बुडवण्यासाठी आणि नंतर मर रोगासाठी याचा वापर होतो.
प्रश्न २६: भातात (Paddy) Bavistin चालते का?
उत्तर: हो, भातामधील Blast (करपा) आणि Sheath Blight (बुडकुज) यावर हे खूप प्रभावी आहे.
प्रश्न २७: सोयाबीन मध्ये Bavistin कधी द्यायचा?
उत्तर: शेंगा भरण्याच्या अवस्थेत पानावरील ठिपके आणि शेंगकुज रोखण्यासाठी.
प्रश्न २८: Bavistin सर्व पिकांसाठी सुरक्षित आहे का?
उत्तर: हो, शिफारस केलेल्या मात्रेत वापरल्यास हे पिकासाठी सुरक्षित आहे.
प्रश्न २९: Bavistin कीटकनाशकांसोबत मिसळता येतो का?
उत्तर: हो, हे बहुतेक सर्व कीटकनाशकांसोबत मिसळता येते.
प्रश्न ३०: Bavistin विद्राव्य खतांसोबत (१९:१९:१९) देता येतो का?
उत्तर: हो, विद्राव्य खतांसोबत Bavistin देता येते.
प्रश्न ३१: Bavistin, Copper किंवा Sulphur सोबत मिसळू शकतो का?
उत्तर: नाही. हे बोर्डो मिश्रण किंवा अल्कधर्मी (Alkaline) औषधांसोबत मिसळू नये.
प्रश्न ३२: Tank-mix करताना Bavistin कधी टाकावे?
उत्तर: याची आधी बादलीत पेस्ट बनवा (कारण हे WP आहे) आणि मग टाकीत टाका.
प्रश्न ३३: Bavistin ठिबक (Drip) किंवा आळवणी (Drenching) द्वारे देता येते का?
उत्तर: हो, मुळकुज (Root rot) आणि जमिनीत होणाऱ्या बुरशीसाठी हे सर्वोत्तम आहे.
प्रश्न ३४: Bavistin मुळे पीक हिरवेगार होते का?
उत्तर: हो, रोग गेल्यामुळे पिकात सुधारणा होते आणि पाने तजेलदार दिसतात.
प्रश्न ३५: Bavistin मुळे फुलगळ होते का?
उत्तर: नाही, शिफारस केलेल्या प्रमाणात वापरल्यास फुलगळ होत नाही.
प्रश्न ३६: Bavistin चा परिणाम किती दिवस टिकतो?
उत्तर: साधारणपणे १० ते १५ दिवस पिकाला संरक्षण मिळते.
प्रश्न ३७: PHI (Pre-harvest interval) किती दिवस आहे?
उत्तर: फवारणीनंतर साधारण ७ ते १४ दिवस भाजीपाला तोडू नये.
प्रश्न ३८: Bavistin बीजप्रक्रियेसाठी (Seed Treatment) वापरता येते का?
उत्तर: हो, बीजप्रक्रियेसाठी (२ ते ३ ग्रॅम प्रति किलो) हे सर्वात जास्त वापरले जाणारे औषध आहे.
प्रश्न ३९: Bavistin वापरल्यानंतर उत्पादन वाढते का?
उत्तर: हो, पिकाचे बुरशीपासून संरक्षण झाल्याने उत्पादनात वाढ होते.
प्रश्न ४०: Resistance management कसे करावे?
उत्तर: एका हंगामात दोनपेक्षा जास्त वेळा वापरू नका. अधूनमधून M-45 किंवा Z-78 सारखे स्पर्शजन्य औषध वापरा.
प्रश्न ४१: Bavistin कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?
उत्तर: Bavistin हे Crystal या नामांकित कंपनीचे उत्पादन आहे.
प्रश्न ४२: Bavistin स्वस्त आहे की महाग?
उत्तर: हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर (Very Affordable/Cheap) आणि प्रभावी औषध आहे.
प्रश्न ४३: Bavistin हे खूप जास्त बुरशी आल्यावर (Heavy Infestation) एकटे काम करेल का?
उत्तर: नाही, खूप जास्त प्रादुर्भाव असल्यास Bavistin सोबत M-45 किंवा Captan मिसळून वापरावे.
प्रश्न ४४: Bavistin पावडर स्वरूपात आहे की लिक्विड?
उत्तर: Bavistin हे WP (Wettable Powder) स्वरूपात येते.
आमच्याशी संपर्क करा.
📲 WhatsApp📞 कॉल
⭐ शेतकऱ्यांचे Bavistin बद्दलचे खरे रिव्ह्यू
आमच्या शेतकऱ्यांनी वापरून दिलेले अनुभव – प्रभाव जाणून घ्या 👇
भुरी आली होती पण Galileo फवारणी दिल्यावर 3–4 दिवसात छान परिणाम दिसला. पानं healthy आणि चमकदार झाली.
पानांवर रिंग सारखे डाग आले होते. Galileo + एक contact fungicide दिल्यावर रोग वाढ थांबली. उत्पादनातही स्पष्ट फरक!
द्राक्ष बागेत powdery mildew वाढत होता. Galileo दिल्यावर fungal spread पूर्ण थांबला आणि पिकाचा shine खूप वाढला.
सोयाबीनमध्ये छोटे-छोटे ठिपके होते. Galileo दिल्यावर 3 दिवसात improvement दिसली आणि spread थांबला.
⭐ शेतकऱ्यांचे farmspot crop schedule वापरल्यानंतरच्या प्रतिक्रिया
“फार्मस्पॉटच्या मार्गदर्शनामुळे माझ्या टोमॅटो पिकात ३०% उत्पादन वाढ झाली. सल्ला अत्यंत उपयुक्त.”
“खातांची योग्य मोजमाप आणि फवारणी शेड्यूलने पिकांचे आरोग्य प्रचंड सुधारले.”
“उत्पादनात सुधारणा दिसली; उत्पादने आणि सल्ला दोन्ही विश्वासार्ह.”
Bavistin बुरशीनाशक संबंधित फेसबूक पोस्ट
Bavistin बुरशीनाशक संबंधित Instagram पोस्ट
Bavistin बुरशीनाशक संबंधित ब्लॉग








