Sale!

Admire

Price range: ₹480.00 through ₹2,043.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव
Bayer
उत्पादनाचे नाव
Admire
वापरण्याचा प्रकार
फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक घटक
Imidacloprid 70% WG
रासायनिक गट
Neonicotinoid
कीटकनाशकाचा प्रकार
आंतरप्रवाही

🎥 उत्पादन व्हिडिओ

Token (Dinotefuran 20% WG) वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: Bayer-Confidor-Super-insecticide-1 Category: Tag: Brand:

Description

रासायनिक घटक

यामध्ये इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू.जी. (Imidacloprid 70% WG) हा रासायनिक घटक असतो.

रासायनिक गट

▸निओनिकोटिनॉइड (Neonicotinoid) — निकोटिनिक ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर सक्रिय करणारा समूह.

कीटकनाशक प्रकार व प्रवेश मार्ग

▸ प्रकार: आंतरप्रवाही (Systemic)
पचनमार्गाद्वारे (Stomach entry) — फवारणी किंवा जमिनीतून दिल्यानंतर पानांद्वारे/मुळांद्वारे शोषले जाते व वनस्पतीच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. रसशोषक किडी पर्णरस शोषतात तेव्हा हे त्यांच्या शरीरात पोहोचते.
▸त्वचेद्वारे (Contact entry) — फवारणीवेळी थेट किडींच्या त्वचेवर संपर्क झाल्यास त्वचेमधून प्रवेश करते.

कार्यपद्धती (Mode of Action)

इमिडाक्लोप्रिड हे कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे द्रव्य कीटकांच्या निकोटिनिक ऍसिटाइलकोलिन रिसेप्टरवर कार्य करून चेतासंस्थेतील संदेशवाहक द्रव्यांचा प्रवाह विस्कळीत करते, परिणामी किड्यांची हालचाल बंद होते, अन्न घेणे थांबते व शेवटी मृत्यू होतो.

वापरण्याची पद्धत

▸ फवारणी (Foliar Spray)
▸ आळवणी (Soil Drench)
▸ ठिबक (Drip Irrigation)

शिफारस केलेली पिके व लक्ष्यित किडी

▸ कापूस: मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स
▸ भात: तुडतुडे, तपकिरी तुडतुडे (Brown Plant Hopper)
▸ भाजीपाला (टोमॅटो, वांगी, भेंडी): मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स
▸ ऊस: पांढरी माशी
▸ फळ पिके (द्राक्षे, लिंबूवर्गीय, आंबा): रसशोषक किडी, मिलीबग
▸ रसशोषक किडींच्या नियंत्रणाद्वारे विषाणूजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण मिळते.

फवारणी प्रमाण

▸ फवारणी: 0.2 ते 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी
▸ आळवणी / ठिबक: 100–150 ग्रॅम प्रति एकर

किडीच्या अवस्थांवर परिणाम

▸अंडी फुटल्यानंतरचे निंफ तसेच प्रौढ अवस्थेतील रसशोषक किडींवर प्रभावी नियंत्रण.

वैशिष्ट्ये व फायदे

▸ जलद परिणाम देणारे व दीर्घकाळ संरक्षण करणारे कीटकनाशक.
▸ पिकामध्ये आत शोषले जाऊन संपूर्ण वनस्पतीला संरक्षण देते.
▸ बीजप्रक्रियेसाठी अत्यंत प्रभावी.
▸ ठिबक, आळवणी, फवारणी किंवा बीजप्रक्रिया अशा विविध पद्धतींनी वापरता येते.
▸ रसशोषक किडींवर (aphids, thrips, whiteflies) विशेष प्रभावी.

SEO keywords: Admire कीटकनाशक, Imidacloprid, Bayer, मावा नियंत्रण, थ्रिप्स नियंत्रण, पांढरी माशी नियंत्रण, रसशोषक कीड

🎥 उत्पादन व्हिडिओ (YouTube Short)

खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. PPE वापरा व निर्देशांचे पालन करा.

Additional information

Weight N/A
Weight

150gm, 30gm, 75gm