Description
फवारणीचे फायदे
✅ यामधील Blue Copper या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे उशिरा येणारा करपा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, डाऊनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ यामधील Dhanuka Kasu-B या जिवाणूनाशकाचा वापर केल्यामुळे जिवाणूजन्य करपा, जिवाणूजन्य काळे ठिपके यांसारख्या जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
✅ Blue Copper : 2 gm प्रति लिटर
✅ Dhanuka Kasu-B : 2 ml प्रति लिटर
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
1️⃣ Blue Copper
2️⃣ Dhanuka Kasu-B
फवारणी करताना घ्यायची काळजी
✅ फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम दिसून येतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझलची निवड करावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी. द्रावणाचा pH हा संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.

