Description
फवारणीचे फायदे
✅ यामध्ये BASF Acrobat आणि BASF Polyram या दोन बुरशीनाशकांचा एकत्रित वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, डाऊनी, गेरवा, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ यामध्ये Syngenta Evicent या कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील सर्व किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
✅ BASF Acrobat : 1 gm प्रति लिटर
✅ BASF Polyram : 2 gm प्रति लिटर
✅ Syngenta Evicent : 24 gm प्रति 200 लिटर
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
1️⃣ BASF Acrobat
2️⃣ BASF Polyram
3️⃣ Syngenta Evicent
फवारणी करताना घ्यायची काळजी
✅ फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम दिसून येतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझलची निवड करावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी. द्रावणाचा pH हा संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.

