Sale!

Cabrio Top

Price range: ₹819.00 through ₹1,439.00

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नाव BASF
उत्पादनाचे नाव Cabrio Top
वापरण्याची पद्धत फवारणी

रासायनिक घटक

Chemical Composition

रासायनिक
घटक
Pyraclostrobin 5% +
Metiram 55% WG
रासायनिक
गट
 Strobilurin +
Dithiocarbamate 
बुरशीनाशक प्रकार आंतरप्रवाही + स्पर्शजन्य

Actara वापराचे फायदे जाणून घ्या 👇

SKU: BASF-Cabrio-Top-Fungicide Category: Tag: Brand:

Description

रासायनिक घटक

मेटिरम 55% + पायराक्लोस्ट्रोबिन 5% डब्ल्यू.जी. (Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG)

रासायनिक गट

▸एथिलिन बिस्-डायथिओकार्बामेट्स + स्ट्रोबिल्यूरिन (Dithiocarbamate +Strobilurin )

बुरशीनाशक प्रकार व क्रिया प्रकार:

बुरशीनाशक प्रकार: स्पर्शजन्य व ट्रान्सलॅमिनर (Contact + Translaminar)

▸ यामधील मेटीराम (Metiram) हा घटक स्पर्शजन्य (Contact) असल्यामुळे फवारणी केल्यानंतर तो पानांच्या आणि फळांच्या पृष्ठभागावर राहतो. तो बुरशीच्या बीजाणूना अंकुरित होण्यापासून रोखतो आणि वनस्पतीला बाहेरून सुरक्षा कवच देतो.

▸ यामधील पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin) हा घटक ट्रान्सलॅमिनर (Translaminar) व स्थानिक आंतरप्रवाही (Locally Systemic) गुणधर्माचा आहे. फवारणीनंतर तो पानांच्या वरच्या भागाद्वारे शोषला जातो आणि पानांच्या खालच्या बाजूला झिरपतो. यामुळे पानांच्या दोन्ही बाजूंना बुरशीजन्य रोगापासून दीर्घकाळ संरक्षण मिळते.

क्रिया प्रकार: प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक (Preventive and Curative)

▸ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरल्यास प्रतिबंधात्मक (Preventive) म्हणून हे अतिशय प्रभावी काम करते. तसेच, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात वापरल्यास हे बुरशीची ऊर्जानिर्मिती थांबवून उपचारात्मक (Curative) नियंत्रण देते.

टिप: कॅब्रिओ टॉप हे प्रामुख्याने ‘प्रतिबंधात्मक’ (Preventive) वापरासाठी सर्वोत्तम आहे. जर बुरशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढला असेल (Heavy Infestation), तर यामध्ये पूर्ण आंतरप्रवाही (Systemic) गुणधर्म कमी असल्यामुळे, हे वाढलेल्या रोगाचे संपूर्ण निर्मूलन (Eradicant action) करू शकत नाही. अशा वेळी, रोगाची तीव्रता पाहून औषध निवडणे योग्य ठरते.

कार्यपद्धती (Mode of Action)

पायराक्लोस्ट्रोबिन (Pyraclostrobin): हे श्वसनक्रिया अवरोधक (Respiration Inhibitor) गटातील बुरशीनाशक आहे. (हे नटिव्हो मधील ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन प्रमाणेच QoI गटात येते).
▸ हे बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) मधील श्वसन साखळीत (Cytochrome bc1 complex) इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमध्ये अडथळा आणते. परिणामी बुरशीच्या पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती (ATP) प्रक्रिया पूर्णपणे थांबते. पेशींना ऊर्जा न मिळाल्यामुळे बुरशीची वाढ खुंटते आणि तिचा नाश होतो.

मेटीराम (Metiram): हे बहु-स्थलीय क्रिया (Multi-site Activity) करणारे स्पर्शजन्य (Contact) गटातील बुरशीनाशक आहे.
▸ मेटीराम हे बुरशीच्या पेशींमधील विविध अत्यावश्यक विकरांच्या (Enzymes) कार्यामध्ये हस्तक्षेप करते (विशेषतः ज्यामध्ये Sulphydryl गट असतात). हे बुरशीच्या श्वसन प्रक्रियेत आणि इतर महत्त्वाच्या चयापचय क्रियांमध्ये (Metabolic processes) एकाच वेळी अनेक ठिकाणी अडथळा आणते.
▸ या बहु-स्तरीय हल्ल्यामुळे, बुरशीचे बीजाणू अंकुरण (Spore Germination) पूर्णपणे रोखले जाते आणि बुरशीचा पानामध्ये शिरकाव होण्याआधीच ती नष्ट होते.

वापरण्याची पद्धत

▸ फवारणी (Foliar Spray)

शिफारस केलेली पिके व लक्ष्यित किडी

पिक लक्ष्यित बुरशीजन्य रोग
कांदा

▸ जांभळा करपा (Primary – Preventive + Early curative)
▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ स्टेमफिलियम करपा (Secondary)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Secondary – early)

कोबी
फुलकोबी
ब्रोकोली
रेड कॅबेज

▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ सेप्टोरिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary – early)
▸ भुरी (Secondary control)

बटाटा

▸ लवकर येणारा करपा – Early blight (Primary)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ लेट ब्लाइट (Secondary – preventive stage)

❌ ब्लॅक स्कर्फ / कंदकुज – योग्य नाही

काकडी
कारले
दोडका
दुधी भोपळा
घोसवळे
▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary – early)
▸ भुरी (Secondary)
आले
हळद

▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ लीफ ब्लॉच / पानांवरील डाग (Secondary)

❌ रायझोम कंदकुज – योग्य नाही

टोमॅटो ▸ अँथ्रॅकोज करपा
▸ लवकर येणारा करपा (Early blight)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके
▸ उशीरा येणारा करपा (Late blight – early stage)
▸ भुरी (secondary)
मिरची
ढोबळी मिरची
▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
▸ भुरी (Secondary)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Secondary – early)
वांगे ▸ अल्टरनारिया पानांवरील ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
▸ अँथ्रॅकोज करपा (Secondary)
▸ भुरी (Secondary)
भेंडी ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ भुरी (Secondary)
गवार ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ अँथ्रॅकोज करपा (Secondary)
कापूस ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ ग्रे मोल्ड (Secondary – early)
झेंडू ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ ग्रे मोल्ड / फुलकुज (Secondary – early)
▸ रस्ट (Secondary)
शेवंती ▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ ग्रे मोल्ड / फुलकुज (Secondary – early)
▸ रस्ट (Secondary)
ऊस ▸ पानांवरील ठिपके
▸ रस्ट (secondary)
भुईमूग ▸ टिक्का रोग – Early leaf spot (Primary)
▸ उशिरा येणारे ठिपके (Primary)
▸ रस्ट (Primary)
सोयाबीन ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ सेप्टोरिया तपकिरी ठिपके (Primary)
▸ रस्ट (Primary)
वाल घेवडा ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ रस्ट (Secondary)
मटकी
मुग
चवळी
उडीद
▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा ठिपके (Primary)
▸ रस्ट (Secondary)
हरभरा ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
▸ अँथ्रॅकोज करपा (Secondary)
▸ रस्ट (Secondary)
वाटाणा ▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
▸ अँथ्रॅकोज करपा (Secondary)
▸ रस्ट (Secondary)
कलिंगड
खरबूज
▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनेरीया पानांवरील ठिपके (Primary)
▸ डाऊनी मिल्ड्यू (Primary – early)
▸ भुरी (Secondary)
भात ▸ तपकिरी ठिपके (Primary)
▸ ब्लास्ट (Secondary – leaf blast stage)
▸ शीथ ब्लाइट (Secondary – early)
गहू ▸ पानांवरील ठिपके (Primary)
▸ अल्टरनेरीया ठिपके (Primary)
▸ रस्ट (Secondary)
मका

▸ पानांवरील ठिपके (Primary)
▸ रस्ट (Secondary)
▸ टरकळी करपा (Secondary)

फ्रेंच बिन्स ▸ अँथ्रॅकोज करपा (Primary)
▸ अल्टरनारिया ठिपके (Primary)
▸ सरकोस्पोरा पानांवरील ठिपके (Primary)
▸ रस्ट (Secondary)

Pyraclostrobin 5% + Metiram 55% WG – संपूर्ण बुरशी व लक्षणे ओळख चार्ट

बुरशीचे नाव
(Scientific Name)
त्यामुळे होणारा रोग
(Disease Name)
लक्षणे
(Symptoms)
फायटोप्थोरा इन्फेस्टन्स
(Phytophthora infestans)
उशिरा येणारा करपा
(Late Blight)
पानांवर किंवा फांद्यांवर अनियमित आकाराचे, पाण्यासारखे (Water-soaked) डाग पडतात. पाने वेगाने कुजतात आणि काळी पडतात. बटाटा आणि टोमॅटोमध्ये हे जास्त दिसते.
अल्टरनारिया सोलानी
(Alternaria solani)
लवकर येणारा करपा
(Early Blight)
पानांवर एकात-एक अशी वलये (Concentric rings) असलेले ‘टार्गेट बोर्ड’ सारखे तपकिरी ठिपके दिसतात. पाने पिवळी पडून गळतात.
प्लास्मोपारा / सिडोपेरोनोस्पोरा
(Plasmopara / Pseudoperonospora)
केवडा / डाउनि मिल्ड्यू
(Downy Mildew)
पानांच्या वरच्या बाजूला पिवळसर तेलकट डाग दिसतात आणि पानांच्या खालच्या बाजूस पांढरी किंवा जांभळट कापसासारखी बुरशी वाढते (द्राक्ष, काकडी, वेलवर्गीय भाज्या).
एरीसिफी / ओडियम
(Erysiphe / Oidium spp.)
भुरी
(Powdery Mildew)
पानांच्या, फुलांच्या किंवा फळांच्या पृष्ठभागावर पांढरी, पिठासारखी पावडर (White powdery growth) जमा होते. पाने कडक होऊन वाकडी होतात (द्राक्ष, मिरची, जिरे).
कोलेटोट्रिकम
(Colletotrichum spp.)
अँथ्रॅकोज / फळकुज / डायबॅक
(Anthracnose / Fruit Rot)
फळांवर काळे, खोलगट गोलाकार डाग पडतात. मिरचीचे शेंडे वरून खाली वाळत येतात (Die-back). द्राक्षात याला ‘माणिक्या’ असेही म्हणतात.
फायटोप्थोरा निकोटियाना
(Phytophthora nicotianae)
बक आय रॉट / फळकुज
(Buck Eye Rot)
टोमॅटो फळावर तपकिरी रंगाचे गोलाकार पट्टे दिसतात, जे हरणाच्या डोळ्यासारखे (Buck eye) दिसतात. फळ आतून सडते.
अल्टरनारिया पोरी
(Alternaria porri)
जांभळा करपा
(Purple Blotch)
कांद्याच्या पातीवर लांबट, पांढरट डाग पडतात जे नंतर जांभळ्या रंगाचे होतात. पात वाकडी होऊन मोडते.
अल्टरनारिया मॅक्रोस्पोरा
(Alternaria macrospora)
पानांवरील ठिपके
(Leaf Spot)
कापूस किंवा सोयाबीनच्या पानांवर तपकिरी ठिपके पडतात. ठिपक्यांच्या कडा लालसर असतात. जास्त प्रादुर्भावामुळे पाने गळतात.
राम्युलारिया एरियोला
(Ramularia areola)
ग्रे मिल्ड्यू / दहिया रोग
(Grey Mildew)
कापसाच्या पानांवर पांढरे/राखाडी रंगाचे कोनीय (Angular) ठिपके दिसतात, जणू काही पानावर दही शिंपडले आहे. पाने लाल पडून गळतात.
सर्कोस्पोरा
(Cercospora spp.)
टिक्का रोग / फ्रॉग आय स्पॉट
(Leaf Spot)
भुईमूग: पानांवर गडद तपकिरी ठिपके आणि भोवती पिवळी कडा (Tikka).
सोयाबीन: बेडकाच्या डोळ्यासारखे राखाडी मध्य आणि लाल कडा असलेले ठिपके (Frog eye).
एक्सेरोहिलम टर्सिकम
(Exserohilum turcicum)
पानांवरील करपा
(Turcicum Leaf Blight)
मक्याच्या पानांवर लांबट, होडीच्या आकाराचे (Boat shaped) मोठे करपलेले चट्टे दिसतात. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

फवारणी प्रमाण

▸ प्रमाण : 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी (पिकानुसार बदलते)

 Pyraclostrobin 5% + Metiram 55% WG – प्रतिकारशक्ती व्यवस्थापन

 Pyraclostrobin 5% + Metiram 55% WG साठी प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (Resistance Management) खालीलप्रमाणे आहे:

‘क्रॉस रेझिस्टन्स’ टाळणे (Avoid Cross-Resistance):
▸ शास्त्रीय कारण: यामध्ये ‘पायराक्लोस्ट्रोबिन’ हा घटक ‘स्ट्रोबिल्युरिन’ (QoI – FRAC Group 11) गटातील आहे. जरी यासोबत मेटिरॅम असले, तरी बुरशीने जर पायराक्लोस्ट्रोबिन विरोधात प्रतिकारशक्ती तयार केली, तर ती याच गटातील इतर बुरशी नाशकांनाही  (उदा. अझॉक्सिस्ट्रोबिन, ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन) दाद देत नाही.
▸ टीप: जर तुम्ही एकदा कॅब्रिओ टॉप वापरले असेल, तर लगेच पुढील फवारणीत ‘अमिस्टार’, ‘नॅटिव्हो’ किंवा ‘एर्गॉन’ सारखी स्ट्रोबिल्युरिन गटातील बुरशीनाशक वापरू नका. त्याऐवजी वेगळ्या गटाचे (उदा. ट्रायझोल) औषध वापरा.

‘मोड ऑफ ॲक्शन’ मध्ये बदल (Rotate Mode of Action):
▸ शास्त्रीय कारण: हे एक ‘संयुक्त बुरशीनाशक’ (Pre-mix) आहे. यातील ‘पायराक्लोस्ट्रोबिन’ हे सिंगल साईट (Single Site) आहे, तर ‘मेटिरॅम’ हे मल्टी-साईट (Multi-site) आहे. मेटिरॅममुळे पायराक्लोस्ट्रोबिनला संरक्षण मिळते, परंतु सतत याचाच वापर केल्यास बुरशीची सहनशक्ती वाढू शकते.
▸ टीप: साखळी तोडण्यासाठी, मेटिरम 55% + पायराक्लोस्ट्रोबिन 5% डब्ल्यू.जी च्या दोन फवारण्यांच्या मध्ये पूर्णपणे वेगळ्या गटातील (उदा. स्कोअर, टिल्ट किंवा साधे M-45) औषधाची फवारणी घ्यावी.

‘टँक मिक्स’ धोरण (Tank Mix Strategy):
▸ शास्त्रीय कारण:  हे स्वतःच एक आदर्श ‘टँक मिक्स’ (Ready Mixture) आहे. यामध्ये ५५% मेटिरॅम (जे M-45 सारखेच काम करते) असल्यामुळे, हे वापरताना यात बाहेरून वेगळे स्पर्शजन्य बुरशीनाशक (उदा. M-45 किंवा Z-78) मिसळण्याची गरज नाही.
▸ टीप: हे ‘स्टँड अलोन’ (Stand-alone) उत्पादन म्हणून वापरावे. यात दुसरे बुरशीनाशक मिसळून खर्च वाढवू नका, कारण यात आधीच रेझिस्टन्स मॅनेजमेंटची सोय केलेली आहे.

वापराची वारंवारता (Frequency of Application):
▸ नियम: यामध्ये ‘हाय रिस्क’ घटक (पायराक्लोस्ट्रोबिन) असल्याने, एका पिकाच्या हंगामात (Crop Season) हे जास्तीत जास्त २ ते ३ वेळाच वापरावे.
▸ टीप: सलग (Sequential) दोन पेक्षा जास्त फवारण्या कॅब्रिओ टॉपच्या घेऊ नयेत. मधल्या काळात स्पर्शजन्य औषधांचा वापर करावा.

उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर (Preventive over Curative):
▸ शास्त्रीय कारण: मेटिरम 55% + पायराक्लोस्ट्रोबिन 5% डब्ल्यू.जी हे बुरशीचे ‘बीजाणू अंकुरण’ (Spore Germination) रोखण्यात जगात सर्वोत्तम मानले जाते. जेव्हा बुरशीची संख्या कमी असते (रोग येण्याआधी), तेव्हा हे १००% प्रभावी ठरते. रोग खूप वाढल्यावर (Curative) वापरल्यास, बुरशीनाशकला न जुमानणारी बुरशी तयार होण्याची शक्यता वाढते.
▸ टीप: रोगाची लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका. वातावरण ढगाळ असल्यास किंवा पावसाळी असल्यास, रोग येण्यापूर्वीच (Preventive) याची फवारणी केल्यास सर्वात उत्कृष्ट रिझल्ट मिळतो.

योग्य डोस आणि कव्हरेज (Optimal Dose & Selection Pressure):
▸ शास्त्रीय कारण: कमी डोस वापरल्यास बुरशीवर ‘निवड दबाव’ (Selection Pressure) कमी पडतो आणि बुरशीची पुढची पिढी अधिक शक्तिशाली बनते. तसेच, यातील ‘मेटिरॅम’ हे स्पर्शजन्य असल्याने ते पानाच्या प्रत्येक भागावर पोहचणे गरजेचे आहे. ▸ टीप: नेहमी कंपनीने शिफारस केलेला डोस (साधारण २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर) वापरावा आणि फवारणी करताना झाड पूर्ण ओलेचिंब होईल व पानांच्या खालच्या बाजूलाही औषध पोहचेल याची काळजी घ्यावी.

मुख्य वैशिष्ट्ये:

Mode of Entry (प्रवेश पद्धत): संपर्क + ट्रान्सलॅमिनर (Contact + Translaminar) — हे पानांच्या पृष्ठभागावर राहून आणि पानांच्या आरपार (Translaminar) जाऊन बुरशीला दोन्ही बाजूंनी रोखते.

परिणाम किती दिवस टिकतो: या बुरशीनाशकाचा परिणाम साधारणपणे १०–१४ दिवस टिकतो (हवामान आणि रोगाच्या तीव्रतेनुसार).

दोन घटकांचा फायदा: Metiram (55%) + Pyraclostrobin (5%) एकत्र आल्याने दुहेरी सुरक्षा मिळते. Metiram हे ‘मल्टी-साइट’ (Multi-site) असल्याने बुरशीची प्रतिकारशक्ती (Resistance) तयार होत नाही, तर Pyraclostrobin हे बुरशीच्या पेशींची ऊर्जा निर्मिती थांबवून जलद नियंत्रण देते.

प्रतिबंधात्मक + उपचारात्मक: हे रोग येण्यापूर्वी (Preventive) सुरक्षा कवच तयार करते आणि रोग आल्यानंतर (Curative) बुरशीची वाढ त्वरित थांबवून तिला पसरण्यापासून रोखते.

फायटोटॉनिक इफेक्ट (AgCelence): यामध्ये ‘AgCelence’ टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे पाने अधिक हिरवीगार होतात (Greening Effect). प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारते, पिकाचा ताण (Stress) कमी होतो आणि एकूण उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होते.

WG फॉर्म: हे WG (Water Dispersible Granules) स्वरूपात म्हणजेच पाण्यात विरघळणाऱ्या दाणेदार स्वरूपात येते. हे पाण्यात टाकल्यावर वेगाने विरघळते, वापरण्यास सुरक्षित आहे आणि पानांवर डाग न पाडता एकसारखे पसरते.

🎥 कृषिविद्या व्हिडिओ

खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇

Strobilurin आधारित बुरशीनाशक कॉम्बिनेशनची परिणामकारकता.

रोग गट / Fungal Group Azoxystrobin Trifloxystrobin Picoxystrobin Kresoxim Methyl Pyraclostrobin
ओओमायसीट (Oomycetes)
(Downy mildew, Phytophthora, Pythium)
★ ★ ★ ★ ★ ★ ★
ॲस्कोमायसीट (Ascomycetes)
(Powdery mildew, Anthracnose, Leaf spot)
★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★
बेसिडियोमायसीट (Basidiomycetes)
(Rust, Smut)
★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★ ★
ड्यूटेरोमायसीट (Deuteromycetes)
(Leaf spot, Early blight — Alternaria)
★ ★ ★ ★

★ ★ ★— उत्कृष्ट (Excellent)
★ ★— मध्यम / चांगले (Good)
— कमी / सीमित (Low)

BASF Cabrio Top ला पर्याय म्हणून खालील उत्पादनांचा वापर करू शकता.

उत्पादन फोटो 200 लि. साठी पॅकिंग किंमत खरेदी
Mahindra
Alcoat
200 लि. साठी : 250 ml ₹ — View
PI Clutch 200 लि. साठी : 250 ml ₹ — View
Best Agro Life
Promos
200 लि. साठी: 200 gram ₹ — View

शेतकऱ्यांचे Cabrio Top बद्दल सर्वाधिक विचारले जाणारे 44 प्रश्न

1) Cabrio Top बुरशीनाशक कोणत्या प्रकारचे आहे?

Cabrio Top हे ‘स्पर्शजन्य’ (Contact) आणि ‘ट्रान्सलॅमिनर’ (Translaminar) अशा दुहेरी गुणधर्माचे संयुक्त बुरशीनाशक आहे.

  2) Cabrio Top कोणत्या रासायनिक गटातील आहे?

  हे Dithiocarbamate (Metiram) आणि Strobilurin (Pyraclostrobin) या दोन गटांचे मिश्रण आहे.

  3) Cabrio Top आंतरप्रवाही (Systemic) आहे का?

  पूर्णपणे नाही. हे ‘स्थानिक आंतरप्रवाही’ (Locally Systemic/Translaminar) आहे, जे पानाच्या आरपार जाते.

  4) Cabrio Top ट्रान्सलॅमिनर इफेक्ट (Translaminar Effect) देतो का?

  हो, औषध पानाच्या वरच्या बाजूला पडले तरी ते खालच्या बाजूला जाऊन बुरशी मारते.

  5) Cabrio Top कोणत्या रोगांवर जास्त परिणामकारक आहे?

  करपा (Early Blight), उशिरा येणारा करपा (Late Blight), डाऊनी मिलड्यू (Downy), फळकूज (Anthracnose).

  6) Cabrio Top आणि Amistar मध्ये काय फरक आहे?

  Amistar हे सिंगल (Strobilurin) आहे, तर Cabrio Top हे ‘Contact + Strobilurin’ चे कॉम्बिनेशन आहे जे दुहेरी संरक्षण देते.

  7) Cabrio Top ला पर्याय (Substitute) काय आहेत?

  याला पर्याय म्हणून Sectin, Acrobat किंवा Merivon वापरू शकता (घटक वेगळे असू शकतात).

  8) Cabrio Top डाऊनी (Downy Mildew) वर प्रभावी आहे का?

  हो, डाऊनी मिलड्यूसाठी हे एक उत्कृष्ट ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ बुरशीनाशक आहे.

  9) लवकर येणारा करपा (Early Blight) साठी Cabrio Top वापरावे का?

  हो, टोमॅटो आणि बटाट्यात लवकर येणाऱ्या करप्यावर हे प्रतिबंधात्मक म्हणून उत्तम काम करते.

  10) उशिरा येणाऱ्या करप्यावर (Late Blight) याचा रिझल्ट येतो का?

  हो, यातील मेटिरॅम घटकामुळे हे लेट ब्लालाईटवर चांगले संरक्षण देते; जास्त प्रादुर्भाव असल्यास जोडीदार औषध वापरा.

  11) Cabrio Top फळकूज (Anthracnose) थांबवते का?

  हो, मिरची आणि फळपिकांमध्ये अँथ्रॅकनोज नियंत्रणासाठी हे खूप प्रभावी आहे.

  12) पानांवरील ठिपके (Leaf Spot) वर किती परिणामकारक?

  सर्कोस्पोरा आणि इतर पानांवरील ठिपक्यांसाठी हे अत्यंत प्रभावी नियंत्रण देते.

  13) Cabrio Top डाय बॅक (Die-back) नियंत्रणासाठी वापरता येते का?

  हो, मिरचीमधील शेंडा वाळणे (Die-back) रोखण्यासाठी याचा वापर होतो.

  14) पानांवर डाग आले असतील तर Cabrio Top द्यावे का?

  हो, बुरशीजन्य डाग असतील तर हे पुढील वाढ थांबवते.

  15) Cabrio Top चे डोस प्रमाण (Dosage) किती आहे?

  साधारणपणे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी (हे ग्रॅन्युल्स स्वरूपात असते).

  16) एका एकरासाठी किती Cabrio Top लागते?

  एका एकरासाठी साधारण 400 ग्रॅम ते 600 ग्रॅम (200 लिटर पाण्यासाठी).

 17) Cabrio Top किती दिवसांनी पुन्हा फवारावे?

  सामान्यतः 10-14 दिवसांनी दुसरी फवारणी घेऊ शकता.

  18) रोग फार वाढला असेल तर डोस किती ठेवावा?

  डोस 3 ग्रॅम/लिटर पेक्षा जास्त वाढवू नका; त्याऐवजी क्युरेटिव्ह जोडीदार (Partner Fungicide) वापरा.

  19) पावसाळ्यात Cabrio Top वापरू शकतो का?

  हो, याची पावसाला दाद न देण्याची क्षमता (Rainfastness) चांगली आहे, स्टिकर वापरल्यास उत्तम.

  20) फवारल्यानंतर पाऊस आला तर परिणाम कमी होणार का?

  फवारणीनंतर किमान 2 तास पाऊस आला नाही तर रिझल्ट चांगला मिळतो.

 21) फवारणीस योग्य वेळ कोणती?

  सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर शांत वातावरणात फवारणी करावी.

  22) टोमॅटोमध्ये Cabrio Top कोणत्या रोगावर देतात?

  करपा (Early/Late Blight) आणि पानांवरील काळे ठिपके (Septoria) साठी सर्वोत्तम.

  23) मिरचीमध्ये Cabrio Top वापरू शकतो का?

  हो, मिरचीतील फळकूज (Anthracnose) आणि डाय बॅक (Die-back) साठी हे खूप प्रभावी आहे.

  24) द्राक्षामध्ये Cabrio Top कधी वापरावे?

  द्राक्षामध्ये डाऊनी (Downy Mildew) नियंत्रणासाठी आणि मणी सेटिंग नंतर हे वापरले जाते.

  25) बटाट्यात लवकर येणाऱ्या करपा नियंत्रणासाठी Cabrio Top वापरावे का?

  हो, बटाटा पिकात अर्ली आणि लेट ब्लालाईट दोन्हीसाठी हे उपयुक्त आहे.

  26) मका (Maize) पिकावर याचा वापर होतो का?

  हो, मक्यावरील ‘टुरसीकम लिफ ब्लालाईट’ (Turcicum Leaf Blight) साठी BASF ने शिफारस केली आहे.

  27) सोयाबीन मध्ये Cabrio Top कधी द्यायचा?

  फुलोरा अवस्थेत किंवा शेंगा भरताना ‘शेंगा करपा’ टाळण्यासाठी वापरणे फायद्याचे ठरते.

  28) Cabrio Top सर्व पिकांसाठी सुरक्षित आहे का?

  शिफारस केलेल्या भाजीपाला आणि फळपिकांसाठी हे पूर्णपणे सुरक्षित (Phytotonic) आहे.

  29) Cabrio Top इतर कीटकनाशकांसोबत मिसळता येतो का?

  हो, सामान्य कीटकनाशकांसोबत (उदा. Imidacloprid, Acephate) हे मिसळता येते.

  30) सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients) सोबत देता येतो का?

  हो, चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट्स सोबत देता येते, पण आधी थोडे मिसळून पहावे.

  31) Cabrio Top हे कॉपर (Copper) किंवा सल्फर (Sulphur) सोबत मिसळावे का?

  नाही, शक्यतो कॉपर आणि सल्फर सोबत मिसळणे टाळावे (Incompatibility Risk).

  32) Tank-mix करताना Cabrio Top कधी टाकायचा?

  हे ग्रॅन्युल्स (WG) असल्यामुळे, हे सर्वात आधी थोडे पाणी घेऊन वेगळे विरघळवून टाकीत टाकावे.

  33) Cabrio Top ठिबक (Drip) द्वारे देता येतो का?

  नाही, हे फवारणीचे (Foliar Spray) बुरशीनाशक आहे, ड्रिपने देऊ नये.

  34) Cabrio Top मुळे पिकाला शायनिंग (Shine) येते का?

  हो, यातील पायराक्लोस्ट्रोबिन मुळे पिकाला ‘ग्रीनिंग इफेक्ट’ (Greening Effect) मिळतो.

  35) Cabrio Top मुळे करपल्यासारखे (Phytotoxicity) होते का?

  योग्य डोस घेतल्यास होत नाही; पण उन्हात जास्त डोस झाल्यास पानांच्या कडा करपू शकतात.

  36) Cabrio Top चा परिणाम किती दिवस टिकतो?

  स्वच्छ हवामानात 12 ते 15 दिवस संरक्षण मिळते.

  37) PHI (काढणीपूर्व कालावधी) किती दिवस आहे?

  पिकानुसार बदलतो, पण साधारणपणे भाजीपाल्यासाठी 5-7 दिवस पकडावे.

  38) Cabrio Top सेंद्रिय शेती (Organic Farming) साठी चालते का?

  नाही, हे रासायनिक बुरशीनाशक आहे.

  39) Cabrio Top वापरल्यानंतर उत्पादन वाढते का?

  हो, पिकाचा ताण (Stress) कमी होऊन प्रकाश संश्लेषण वाढल्याने उत्पादन व दर्जा सुधारतो.

  40) Cabrio Top मुळे बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती (Resistance) येते का?

  यामध्ये दोन घटक (Combo) असल्याने प्रतिकारशक्ती लवकर येत नाही, तरीही आलटून-पालटून फवारणी करावी.

  41) Cabrio Top नक्की कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे?

  हे ‘BASF’ या नामांकित जर्मन कंपनीचे उत्पादन आहे.

  42) Cabrio Top महाग आहे; स्वस्त पण प्रभावी पर्याय कोणता?

  रोग कमी असल्यास M-45 (Mancozeb) किंवा Z-78 स्वस्त पडेल, पण Cabrio Top सारखा ‘लाँग ड्युरेशन’ रिझल्ट मिळणार नाही.

  43) Cabrio Top हे जास्त प्रादुर्भाव (Heavy Disease) झाल्यावर काम करेल का?

  हे ‘प्रतिबंधात्मक’ (Preventive) जास्त चांगले आहे. रोग खूप वाढला असेल तर यासोबत Curative औषध मिसळून मारा.

  44) Cabrio Top एकटे पुरेसे आहे की दुसरा पार्टनर द्यावा?

  रोग येण्याआधी (Preventive) एकटे पुरेसे आहे; पण रोग आल्यावर (Curative) चांगल्या रिझल्टसाठी मिक्स करून मारणे चांगले.

आमच्याशी संपर्क करा.
📲 WhatsApp📞 कॉल

⭐ शेतकऱ्यांचे Cabrio Top बद्दलचे खरे रिव्ह्यू

आमच्या शेतकऱ्यांनी वापरून दिलेले अनुभव – प्रभाव जाणून घ्या 👇

★★★★★
1) मिरचीतील भुरीवर जबरदस्त काम

भुरी आली होती पण Aफवारणी दिल्यावर 3–4 दिवसात छान परिणाम दिसला. पानं healthy आणि चमकदार झाली.

— समीर जाधव, अकोला

★★★★★
2) टोमॅटो पिकातील उशिरा येणारा करपा वर प्रभावी नियंत्रण.

माझ्या प्लॉटमध्ये 60 दिवसांनी खालील पानांवर खूप करपा दिसत होता तेव्हा मी Amistar Top फवारणी साठी वापरले होते ज्याचे मला चांगले रिझल्ट मिळाले.

— भुषण पवार, नाशिक

★★★★☆
3) द्राक्षातील powdery mildew ला perfect

द्राक्ष बागेत powdery mildew वाढत होता. Galileo दिल्यावर fungal spread पूर्ण थांबला आणि पिकाचा shine खूप वाढला.

— मोरेश्वर कदम, संगमनेर

★★★★☆
4) सोयाबीनमध्ये leaf spot कमी झाला

सोयाबीनमध्ये छोटे-छोटे ठिपके होते. Galileo दिल्यावर 3 दिवसात improvement दिसली आणि spread थांबला.

— गणेश पटील, जळगाव

⭐ शेतकऱ्यांचे farmspot crop schedule वापरल्यानंतरच्या प्रतिक्रिया

Farmer photo

★★★★★

“फार्मस्पॉटच्या मार्गदर्शनामुळे माझ्या टोमॅटो पिकात ३०% उत्पादन वाढ झाली. सल्ला अत्यंत उपयुक्त.”

— रामदास पाटील
नाशिक

Farmer photo

★★★★★

“खातांची योग्य मोजमाप आणि फवारणी शेड्यूलने पिकांचे आरोग्य प्रचंड सुधारले.”

— अनिल शिंदे
बुलढाणा

Farmer photo

★★★★☆

“उत्पादनात सुधारणा दिसली; उत्पादने आणि सल्ला दोन्ही विश्वासार्ह.”

— सोमनाथ गायकवाड
संगमनेर

Cabrio Top बुरशीनाशक संबंधित फेसबूक पोस्ट

Cabrio Top बुरशीनाशक संबंधित Instagram पोस्ट

Cabrio Top बुरशीनाशक संबंधित ब्लॉग

टॉमॅटोमध्ये खत व्यवस्थापन

टॉमॅटो पिकासाठी योग्य खतांचा वापर कसा करावा हे जाणून घ्या.

Read More

कांदा रोपवाटिका टिप्स

कांदा पिकासाठी सर्वोत्तम रोपवाटिका आणि काळजी टिप्स.

Read More

सेंद्रिय खतांचा वापर

पिकासाठी सेंद्रिय खतांचा कसा योग्य वापर करावा हे शिका.

Read More

टमाटर रोग नियंत्रण

टॉमॅटो पिकातील रोगांचे नियंत्रण कसे करावे.

Read More

शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढवा.

Read More

 

Additional information

Weight N/A
Weight

300 gm, 600 gm