Description
उत्पादनाचे नाव
pH Tunner
उत्पादकाचे नाव
KayBee Bio Organics
फायदे
याचा वापर केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची तंतुमय वाढ होते, रोपांची ऊंची वाढते, नवीन फुटवे निघतात. पाने रुंद, पसरट, जाड व हिरवीगार होतात. हे पिकावर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते ज्यामुळे फुलांची संख्या वाढते व फुलगळ होत नाही. याचा वापर भाजीपाला पिकांत रोप लागवडीनंतर पहिल्या आळवणीमध्ये केल्यास रोग व पुनर्लागवडीनंतर रोपांवर येणारा ताण कमी होतो व पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ होते. ज्यामुळे रोपे लवकर सेट होण्यास मदत होते. याचा वापर टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय पिकांमध्ये फुलावस्थेत केल्यास पिकांवर येणारा ताण कमी होतो, ज्यामुळे फुलगळ होत नाही व नवीन फुलांची संख्या वाढते. भाजीपाला पिकांत फळ फुगवण्याच्या अवस्थेत फवारणी किंवा ठिबकद्वारे केल्यास फळांचा आकार, गुणवत्ता व वजन वाढते. हे पाणी कमी किंवा जास्त झाल्यानंतर पिकाला ताण कमी करून, पिकास तग धरण्यास मदत करते.
वापरण्याची पद्धत
फवारणी, आळवणी, ठिबक
प्रमाण व वापर
फवारणीसाठी: 2 ते 2.5 ml प्रती लीटर
आळवणीसाठी: 2 ते 2.5 ml प्रती लीटर
ठिबकसाठी: 1 लीटर प्रती एकर
टिप
येथे दिलेली या उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांच्या माहितीसाठी/ संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रक पहा.
🚜 Farmspot विषयी
Farmspot ही एक AgriTech ई-कॉमर्स स्टार्टअप असून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण बुरशीनाशके, कीटकनाशके, खतं, टॉनिक्स व शेती उपकरणं पुरवते. आम्ही पिकानुसार Crop Schedule-based Consultancy देतो ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते.

