Description
फवारणीचे फायदे
✅ यामधील UPL Saaf या बुरशीनाशकाचा वापर भाजीपाला पिकामध्ये केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, गेरवा, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीवजन्य रोगांवर तसेच याचा वापर कांदा पिकामध्ये पीळ रोग,मर रोग, मूळ कुज, जांभळा रपा, कबोट्रीस करपा, मान कुज , फुजारीयम कुज यांसारख्या बुरशीवजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ यामधील NACL Profex Super या किटकनाशकाचा वापर केल्यामुळे तुडतुडे, पांढरी माशी, मावा थ्रीप्स, फळ पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, नागअळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ यामधील Valagro MC Extra या उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो, व रोपांची वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
✅ UPL Saaf : 2 ग्रॅम प्रती लीटर
✅ NACL Profex Super : 2 ml प्रती लीटर
✅ Valagro MC Extra : 2 ग्रॅम प्रती लीटर
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
1️⃣ UPL Saaf
2️⃣ NACL Profex Super
3️⃣ Valagro MC Extra
फवारणी करताना घ्यायची काळजी
✅ फवारणी ही सकाळी लवकर म्हणजेच सकाळी 11 च्या अगोदर किंवा दुपारी उशिरा म्हणजेच दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणी करण्यापूर्वी शेतास पाणी द्यावे, जेणेकरून फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढेल व चांगले परिणाम दिसून येतील.
✅ फवारणी उत्पादने सांगितलेल्या क्रमात पाण्यामध्ये मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर एकसारखे पसरेल अशा प्रकारे फवारणी करावी. त्यासाठी योग्य प्रकारच्या फवारणी नौझलची निवड करावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH तपासूनच फवारणी करावी. द्रावणाचा pH हा संतुलित असावा; जास्त pH चे द्रावण फवारणीसाठी वापरू नये.
