Spraycal

Premium Quality

उत्पादन माहिती

Product Details

उत्पादकाचे नावScient Chemical Pvt. Ltd
उत्पादनाचे नावSpraycal

रासायनिक घटक

Chemical Composition

घटकCalcium 11%
उपलब्ध पॅकिंग100 ml,250 ml,500 ml

🎥 उत्पादन व्हिडिओ

Dripcal वापराचे फायदे आणि परिणाम जाणून घ्या या व्हिडिओमध्ये 👇

Description

फवारणीचे फायदे

टोमॅटो फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये पेशीभित्ती (cell wall) मजबूत होतात आणि पेशींची विभागणी (cell division) अधिक सक्रियपणे होते. यामुळे खोडातील पेशी (stem tissues) घट्ट व मजबूत बनतात, परिणामी खोड जाड व निरोगी विकसित होते. आणि भाजीपाला पिकात खोड जाड असेल तर निघणारे फुटवे व निघणारे शेंडे जाड निघतात. परिणामी निघणाऱ्या फुलांची संख्या व गुणवत्ता चांगली असते. BASF फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे पेशींची विभागणी (cell division) आणि पेशीवाढ (cell elongation) सक्रिय होते, ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीच्या केंद्रांमध्ये (growing points) ऊतकांची निर्मिती वेगाने होते. खोड जाड आणि मजबूत असल्यामुळे त्यामध्ये पाणी व अन्नद्रव्यांचा प्रवाह (translocation) अधिक प्रमाणात व सहजतेने होतो. परिणामी, झाडाला पोषण पुरवठा योग्य प्रमाणात मिळाल्याने फुलांच्या निर्माण प्रक्रियेसाठी (flower initiation process) आवश्यक उर्जा व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.त्यामुळे फुलांची निर्मिती (flower induction) वेगाने होते, फुलांची संख्या वाढते, तसेच फुलांची गुणवत्ता,आकार,रंग आणि टिकाऊपणा सुधारतो.

BASF फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे वनस्पतीमध्ये पेशीभित्ती (cell wall) मजबूत होते आणि परागनलिका (pollen tube) वाढीसाठी आवश्यक कॅल्शियम आयन (Ca²⁺) सहज उपलब्ध होतात. यामुळे परागनलिकेची वाढ (pollen tube elongation) सुरळीत होते आणि फलन प्रक्रिया (fertilization process) प्रभावीपणे पार पडते.फुलधारणेनंतर तयार होणाऱ्या कोवळ्या फळांमध्ये कॅल्शियममुळे पेशींची स्थिरता टिकून राहते, त्यामुळे फुलगळ (flower drop) कमी होते व फळधारणा (fruit set) अधिक प्रमाणात होते. कॅल्शियम पेशीभित्ती मजबूत ठेवल्यामुळे फळांची वाढ नियमित होते,परिणामी झाडावर अधिक फुलं टिकतात, फळधारणा वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाण दोन्ही सुधारतात.BASF फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे फळांतील पेशींची विभागणी (cell division) आणि पेशीवाढ (cell elongation) या दोन्ही प्रक्रिया सक्रिय होतात. कॅल्शियम हे पेशीभित्तीचा (cell wall) मुख्य घटक असल्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या फळांच्या पेशी मजबूत, लवचिक आणि विस्तारक्षम बनतात.यामुळे फळामध्ये पेशींची संख्या व आकार दोन्ही वाढतात, ज्यामुळे फळांचा व्यास (fruit diameter) आणि वजन वाढते. तसेच कॅल्शियममुळे फळांतील पाणी व अन्नद्रव्यांचा वाहतूक प्रवाह (translocation of nutrients and water) सुरळीत राहतो, त्यामुळे फळांना सतत पोषण मिळतं.परिणामी, फळांची वाढ नियमित आणि संतुलित होते.
BASF फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे पिकांच्या पेशीभित्ती (cell wall) आणि पेशीझिल्ली (cell membrane) दोन्ही मजबूत बनतात. कॅल्शियम आयन (Ca²⁺) हे पेशीझिल्लीच्या संरचनेत स्थिरता आणतात व आयनांच्या हालचाली (ion exchange) नियंत्रित ठेवतात. त्यामुळे पेशींमधील पाणी साठवण्याची व नियंत्रित वापरण्याची क्षमता वाढते.ज्यामुळे वनस्पतीत osmotic balance (वनस्पतीच्या पेशीमध्ये पाणी आणि विरघळलेले क्षार (salts, nutrients) यांचं प्रमाण संतुलित ठेवणं.)टिकून राहते, ज्यामुळे उष्णता, दुष्काळ, पाण्याची कमतरता, तसेच क्षारीय किंवा आम्लीय मातीतील ताण अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये stress tolerance (ताण सहन क्षमता) वाढते.BASF फवारणीस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये फळांची पेशीभित्ती (cell wall) आणि पेशीमधील सिमेंटसारखी रचना (middle lamella) मजबूत बनते. कॅल्शियम हे कॅल्शियम पेक्टेट (Calcium pectate) स्वरूपात पेशींना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवते.जेव्हा कॅल्शियम योग्य प्रमाणात उपलब्ध असतं,तेव्हा फळातील पेशी लवचिक (elastic) आणि ताण सहन करण्यास सक्षम राहतात. त्यामुळे फळ वाढीच्या काळात पाणी किंवा अन्नद्रव्यांचा प्रवाह वाढला तरी पेशी फुटत नाहीत.याशिवाय, कॅल्शियममुळे फळांमधील पाणी संतुलन (osmotic balance) नियंत्रित राहतो, ज्यामुळे फळं अचानक फुगून चिरत नाहीत,फळ फुटणे (fruit cracking) किंवा चिरणे कमी होते.UPL Ulala कीटक नियंत्रणस्प्रेकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाचा वापर केल्यामुळे टोमॅटो/शिमला मिरची/वांगे पिकामध्ये ब्लॉसम एंड रॉट (Blossom End Rot) हा रोग होत नाही कारण कॅल्शियम फळांच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.कॅल्शियम हे फळाच्या तळाच्या भागातील (blossom end) पेशींमध्ये भित्ती (cell wall) मजबूत ठेवतं. जेव्हा फळ वाढतं, तेव्हा या भागात पेशींची संख्या आणि आकार झपाट्याने वाढतात अशावेळी जर कॅल्शियम कमी असेल तर पेशींच्या भित्ती कमकुवत होतात आणि त्या फुटून काळपट डाग (necrotic tissue) तयार होतात.ड्रीपकॅलमधील कॅल्शियम आयन (Ca²⁺) या पेशींना स्थिरता (stability) देतात, ज्यामुळे फळाच्या टोकाला होणारी पेशींची नासाडी/कुज थांबते.

 फवारणीसाठी प्रमाण

▸ Scient Chemical Spraycal : 1.5 ते 2 ml प्रति एकर

ड्रीपकॅल सोडताना घ्यावयाची काळजी. 

स्प्रेकॅल हे कॅल्शियमयुक्त उत्पादन आहे ज्याचा वापर सल्फेटआणि फॉस्फेट असलेल्या खतांसोबत करू नये.

कॅल्शियम हे सल्फेट (जिप्सम) आणि फॉस्फेट युक्त उत्पादनांबरोबर पाण्यात विरघळत नाहीत. हे जर एकत्रित मिक्स केले तर ते फवारणीचे द्रावण फाटते (precipitate formation), फवारणीचे नोजल्स (Nozzles) बंद होतात आणि पिकांना कॅल्शियम मिळत नाही.

टीप: जर तुम्हाला कॅल्शियम आणि इतर खते फवारणी करायची असतील, तर ती स्वतंत्रपणे फवारा.


फवारणीची वेळ आणि प्रमाण (Timing and Dosage

▸ कॅल्शियमची फवारणी शक्यतोवर सकाळच्या वेळेस (सूर्यप्रकाश वाढण्यापूर्वी) किंवा संध्याकाळच्या वेळेस (सूर्य मावळल्यावर) करावी, जेव्हा तापमान कमी असते.

▸उष्ण आणि जास्त सूर्यप्रकाश असलेल्या वेळेत फवारणी केल्यास पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation) लवकर होते आणि पानांवर जळल्यासारखे डाग (leaf burn) पडू शकतात.

▸उत्पादक कंपनीने दिलेले शिफारस केलेले प्रमाण (Recommended dosage) तपासा आणि तेवढ्याच प्रमाणात फवारणी करा.


pH पातळी (pH Level)

▸ कॅल्शियम द्रावणाचा pH साधारणपणे ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असल्यास पिकांसाठी ते अधिक प्रभावी ठरते.

▸ फार जास्त किंवा फार कमी pH असलेल्या द्रावणामुळे पानांना इजा होऊ शकते.


फवारणी पद्धत (Application Technique)

▸ कॅल्शियमची फवारणी करताना, संपूर्ण पानांवर (विशेषतः नवीन आणि वाढणाऱ्या पानांवर) समान (Uniform) आच्छादन होईल याची काळजी घ्या.

▸ फवारणीसाठी बारीक फवारा (Fine spray) देणारे नोजल्स वापरा, जेणेकरून पानांद्वारे कॅल्शियमचे शोषण व्यवस्थित होईल.


पाण्याची गुणवत्ता (Water Quality)

▸फवारणीसाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ आणि कमी क्षारता (Low salinity) असलेले असावे.

▸ जर पाणी खूप कठीण (Hard water) असेल (म्हणजे त्यात मॅग्नेशियम आणि इतर क्षारांचे प्रमाण जास्त असेल), तर कॅल्शियमची उपलब्धता आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते. अशा वेळी वॉटर कंडिशनर (Water Conditioner) वापरण्याचा विचार करा.


ओलाव्याचे प्रमाण (Humidity)

▸फवारणीनंतर पानांवर द्रावण जास्त काळ ओले राहणे (Longer wet period) महत्वाचे आहे, कारण त्यामुळे कॅल्शियमचे शोषण सुधारते.

▸जास्त आर्द्रता (High humidity) असताना फवारणी करणे शोषणासाठी चांगले असते. जर हवामान खूप कोरडे असेल, तर फवारणीचा परिणाम कमी होऊ शकतो.


फवारणीची पुनरावृत्ती (Repeat Applications)

▸कॅल्शियम हे पिकांमध्ये मंद गतीने (Slowly mobile) हलणारे अन्नद्रव्य आहे. ते एकदा शोषले गेले की जुन्या भागातून नवीन वाढणाऱ्या भागाकडे पुन्हा जात नाही.

▸त्यामुळे, नवीन वाढणाऱ्या शेंड्यांसाठी आणि फळांसाठी कॅल्शियमची सतत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ठरलेल्या अंतराने (उदा. ७ ते १४ दिवसांनी) फवारणीची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.


फळ/शेंडा केंद्रित फवारणी (Focus on Target Parts)

▸कॅल्शियमची गरज प्रामुख्याने नवीन वाढणारे भाग, फळे आणि कळ्या यांना असते.

▸फवारणी करताना, द्रावण योग्य ठिकाणी पोहचेल याची खात्री करा, विशेषतः फळांवर (उदा. टोमॅटोतील Blossom End Rot टाळण्यासाठी) आणि वाढणाऱ्या शेंड्यांवर (उदा. कोबीमधील टीप बर्न टाळण्यासाठी) लक्ष केंद्रित करा.

खालील व्हिडिओमध्ये उत्पादनाचा वापर दाखवला आहे 👇

टीप: स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. PPE वापरा व निर्देशांचे पालन करा.

Additional information

Weight

2 kg