Description
फवारणीचे फायदे
✅ TATA Master वापरल्यामुळे पिथियम रोपमर व फ्यूजारियम रोपमर यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ Syngenta Actara वापरल्यामुळे रसशोषक किडी, काळी कुरतडणारी अळी, नागअळी, पाने खाणारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ Agroraise RootStar वापरल्यामुळे रोपांच्या पांढऱ्या मुळांची कोकोपीट बाहेर जमिनीत तंतुमय वाढ होते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
▸ TATA Master: 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर
▸ Syngenta Actara: 0.5 ग्रॅम प्रति लिटर
▸ Agroraise RootStar: 1 ग्रॅम प्रति लिटर
फवारणी/आळवणी कसे तयार करावे
✅ आळवणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
▸ TATA Master
▸ Syngenta Actara
▸ Agroraise RootStar
फवारणी/आळवणी कधी करावी
▸ कांदा पिकात रोपलागवडी नंतर 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान
▸ कांदा बियन पेरणी नंतर 12 ते 15 दिवसांच्या दरम्यान
▸ भाजीपाला पिकात रोपलागवडी नंतर 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान
आळवणी करताना घ्यायची काळजी
✅ आळवणी म्हणजे रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पंपाच्या सहाय्याने द्रावण सोडणे.
✅ आळवणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावी; भर उन्हात करू नये.
✅ आळवणीपूर्वी शेतास पाणी द्यावे जेणेकरून मुळांवर ओलावा निर्माण होतो व द्रावण शोषले जाते.
✅ द्रावण रोपांच्या पानांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
✅ वरील सर्व उत्पादने एकत्रित मिसळावीत.
✅ एका रोपास 40 ml द्रावण मिळेल याची काळजी घ्यावी.
आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.
