Description
फवारणीचे फायदे
✅ Indofil Z 78: या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफिलीयम राखाडी ठिपके, सरकोस्पोरा ठिपके, उशिरा येणारा करपा, डाऊनी, गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ Zydex Zytonic Neem: या किटकनाशकांचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी व अळी गटातील किडींवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण मिळते.
✅ Agroraise Amilora: या पोषक उत्पादनाचा वापर केल्यामुळे रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी होतो आणि रोपांची वाढ व विकास चांगली होते.
फवारणी मधील उत्पादनांचे प्रमाण
▸ Indofil Z 78: 2 ग्रॅम प्रति लिटर
▸ Zydex Zytonic Neem: 1 ml प्रति लिटर
▸ Agroraise Amilora: 2 ml प्रति लिटर
फवारणीचे द्रावण कसे तयार करावे
✅ फवारणीचे द्रावण तयार करताना खालील क्रमांकात योग्य प्रमाणात उत्पादने पाण्यामध्ये मिसळावीत:
1️⃣ Indofil Z 78
2️⃣ Zydex Zytonic Neem
3️⃣ Agroraise Amilora
फवारणी करताना घ्यायची काळजी
✅ फवारणी सकाळी 11 पूर्वी किंवा दुपारी 3 नंतर करावी. भर उन्हात फवारणी करू नये.
✅ फवारणीपूर्वी शेतास पाणी द्यावे, ज्यामुळे द्रावणाची कार्यक्षमता वाढते.
✅ उत्पादने सांगितलेल्या क्रमाने पाण्यात मिसळावीत.
✅ फवारणीचे द्रावण रोपांच्या अवयवांवर समान पसरावे, योग्य फवारणी नौझल वापरावी.
✅ फवारणी द्रावणाचा pH संतुलित ठेवावा, जास्त pH चे द्रावण वापरू नये.
✅ फवारणी केल्यानंतर पुढील पाच दिवस लवकर येणारा करपा, पानांवर येणारे काळे ठिपके, रसशोषक किडी यांवर नियंत्रण मिळेल. रोपांवरील जैविक व अजैविक ताण कमी होऊन वाढ जलद होईल.
आमची खासियत म्हणजे Crop Schedule-Based Consulting Services, ज्याद्वारे शेतकऱ्यांना हंगामी व प्रादेशिक हवामानानुसार नियोजनबद्ध शेती करण्यास मदत होते, ज्यामुळे उत्पादनात वाढ व खर्चात बचत होते.

